IND vs SA 3rd Test Day 2: लंचपर्यंत 3 विकेट गमावून दक्षिण आफ्रिकेचे शतक पूर्ण, van der Dussen-पीटरसनने सांभाळला मोर्चा; टीम इंडिया विकेटच्या शोधात
यजमान संघाने भारताच्या पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या सत्राखेरीस तीन बाद 100 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यावर रॅसी व्हॅन डर डुसेन आणि कीगन पीटरसन संघाचा डाव सावरला आहे.
IND vs SA 3rd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) दुसऱ्या दिवसाचा लंच-ब्रेक झाला आहे. यजमान संघाने भारताच्या पहिल्या डावातील 223 धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्या सत्राखेरीस तीन बाद 100 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात दोन विकेट गमावल्यावर रॅसी व्हॅन डर डुसेन आणि कीगन पीटरसन (Keegan Pietersen) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरला आहे. व्हॅन डर डुसेन 17 आणि पीटरसन 40 धावा करून खेळत आहेत. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करताना दिसले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)