IND vs SA 2nd Test Day 2: टीम इंडियाला पहिला धक्का, मार्करमने अप्रतिम कॅच घेत KL Rahul याला पॅव्हिलियनमध्ये धाडलं
मार्को जॅन्सनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करमने भारतीय कर्णधार केएल राहुलला अप्रतिम उडता झेल घेत त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. राहुल दुसऱ्या डावात फक्त 8 धावाच करू शकला.
IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पहिला डाव 229 धावांत गुंडाळून दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला (Team India) पहिला झटका बसला आहे. मार्को जॅन्सनच्या (Marco Jansen) गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करमने भारतीय कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) अप्रतिम उडता झेल घेत त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. 7 षटकांनंतर भारताचा स्कोर 24 धावांवर 1 बाद आहे. राहुलनंतर मयंक अग्रवालला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)