IND vs NZ 1st Test Day 1 Lunch Report: कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क येथे खराब स्थिर सुरुवातीनंतर यजमान टीम इंडियाने (Team India) लंच ब्रेकपर्यंत 29 षटकात एक विकेट गमावून 82 धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात मयंक अग्रवालच्या रूपात संघाला एकमात्र झटका बसला. त्यानंतर शुभमन गिल (Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) अर्धशतकी भागीदारीने संघाला सावरले. यादरम्यान गिलने 81 चेंडूत चौथे कसोटी अर्धशतक झळकावले. दुसरीकडे, न्यूझीलंड (New Zealand) संघ विकेटसाठी धडपडताना दिसला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)