IND vs AUS, WTC Final 2023: फायनलमध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ हातात काळ्या पट्ट्या बांधून उतरले मैदानात, जाणून घ्या काय आहे कारण
ओव्हल येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि हातात काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर खेळायला आले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम (WTC Final 2023) सामना आजपासून ओव्हल येथे खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरू होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंनी ओडिशातील रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्यांसाठी 2 मिनिटे मौन पाळले आणि हातात काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर उतरले. ओव्हल येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि हातात काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर खेळायला आले. बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, "संघ रेल्वे दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करतो आणि ज्यांनी दुःखदपणे आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती तीव्र शोक व्यक्त करतो." जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)