इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 39 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या होम ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. अहमदाबादमध्ये संघाने त्याचा 3 गडी राखून पराभव केला. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ चांगल्या लयीत दिसत आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स: ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटल.
कोलकाता नाइट रायडर्स: एन जगदीसन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड व्हिसा, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
Match 39. Gujarat Titans won the toss and elected to field. https://t.co/SZJorCvgb8 #TATAIPL #KKRvGT #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)