Robbery Caught on Camera in Hyderabad: हैदराबाद येथील सोन्याच्या दुकानात चोरी, मास्कधारी व्यक्तींकडून लाखो रुपयांचे दागीने लंपास

ही घटना मल्कपेटच्या अकबर भाग भागात असलेल्या किशवा ज्वेलरीच्या दुकानात घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हैदराबाद शहराती पट्टापागले येथील सोन्याच्या दुकानात चौरट्यांनी प्रवेश करत लाखो रुपयांचे दागीणे आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना मल्कपेटच्या अकबर भाग भागात असलेल्या किशवा ज्वेलरीच्या दुकानात घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, टोपी आणि मुखवटा घालून दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी ग्राहक असल्याचे दर्शवले. मात्र, त्यानंतर त्यांनी चाकूचा धाक दाखवत दुकानदाराला धमकावले. त्यानंतर त्यांनी दुकानातील दागीणे चोरले आणि गल्ल्यावरील व्यक्तीवर हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे. (हेही वाचा, Wife Dies After Sex On First Night: सेक्स वर्धक गोळ्या घेऊन 'हनिमून' साजरा करण्याच्या नादात वधूने गमावला जीव)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)