Online Game Addiction: राजस्थान मध्ये ऑनलाईन गेम्सच्या व्यसनात मुलाने गमावलं मानसिक संतुलन; पहा काय झालीय अवस्था (Watch Video)
राजस्थान मध्ये एक मुलगा ऑनलाईन गेम्सच्या इतका अधीन झालेला समोर आलं आहे की यामध्ये त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तो थरथरत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्पेशल टीचर भवानी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार तो फ्री फायर सारख्या खेळाच्या आहारी गेला होता. यामध्ये मुलांना अपयश जिव्हारी लागतं. अनेकजण यामध्ये एकतर आत्महत्या करतात किंवा मानसिक संतुलन गमवतात. दरम्यान आता यामध्ये थेरपी म्हणू अशा काही स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीज प्लॅन केल्या आहेत ज्याद्वारा त्याला त्या जिंंकून पुन्हा आत्मविश्वास दिला जाणार आहे. धक्कादायक! ऑनलाइन गेम Free Fire मध्ये गमावले 40,000 रुपये; नैराश्येमधून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)