सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. यामध्ये तुमच्या पोस्टच्या लाईकला, कमेंट्सला खूपच महत्व आले आहे. तर, याआधी काइली जेनरची पोस्ट ही सर्वाधिक लाईक केलेली पोस्ट ठरली होती. त्यानंतर एका अंड्याने हा विक्रम मोडला. एका साध्या अंड्याच्या फोटोला सर्वाधिक लाईक मिळाले होते. आता हा वर्ल्ड रेकॉर्डदेखील मोडला गेला आहे आणि हा विश्वविक्रम मोडणारा दुसरा तिसरा कोणी नसून, तो आहे अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी. नुकतेच फिफा विश्वचषक पार पडला. यामध्ये अर्जेंटिनाने फ्रांसचा पराभव करून विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने हातात फिफा विश्वचषक 2022 ची ट्रॉफी घेतलले एक फोटो व्हायरल झाला. आता या फोटोला (या पोस्टला) अधिकृतपणे इतिहासातील सर्वात जास्त लाइक मिळाले आहेत. आतापर्यंत हा पोस्टला 56 दशलक्ष पेक्षा जास्त लाइक्स मिळाल्या असून, लोक अजूनही हा फोटो लाईक करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)