दारूच्या नशेत Reel शूट करताना Thar रेल्वेच्या रूळांवर चढली; रेल्वे वेळेत थांबल्याने मोठा अपघात टळला (Watch Video)
लोको पायलटने रूळासमोर असलेली रेल्वे गाडी वेळेत थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आणि यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
जयपूर मध्ये दारूच्या नशेत रिल्स बनवण्याच्या नादामध्ये महिंद्रा थार गाडी रेल्वेच्या रूळांमध्ये अडकल्याचं पहायला मिळालं आहे.या गाडीला समोरून येणार्या रेल्वेची धडक बसली असती पण लोको पायलटने गाडी वेळेत थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आणि यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. सध्या या विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये झपाट्याने शेअर केला जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)