जालना मध्ये 13 मे दिवशी होणार्‍या आगामी लोकसभा निवडणूकीच्या मतदानापूर्वी कचर्‍यात मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची जालना जिल्हाधिकारी Dr Shri Krishnanath Panchal यांनी माहिती घेतली आहे. सापडलेली ही मतदार ओळखपत्रं जुनी आहेत. ती अज्ञात व्यक्तीने टाकली आहेत. आम्हाला माहिती मिळताच जालना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ती मतदार ओळखपत्रं तात्काळ जप्त केल असून पुढील तपास असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींची मतदार ओळखपत्रे सापडली आहेत, त्यांना निवडणूक आयोगाकडून नवीन कार्ड मिळाले आहे का, याचाही तपास सुरू आहे. कोणी जाणूनबुजून ही कार्ड टाकली का? त्याला ते कुठून मिळाले? या संदर्भातही चौकशी सुरू आहे. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटलं आहे. Voter ID Card Application: मतदार कार्ड साठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज कसा कराल? पहा आवश्यक कागदपत्रं ते स्टेटस कसं तपासाल? 

जालना मध्ये आढळली कचर्‍यात मतदार ओळखपत्रं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)