'Tula akkal nahi, tu vedi ahes': 'तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस', अशी नवऱ्याने केलेली शेरेबाजी शिवीगाळ नाही; Bombay High Court चे निरीक्षण
पत्नीचा आरोप होता की, तिचा पती ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’, असे शब्द वापरून आपला सतत अपमान करत असतो.
मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच असे निरीक्षण नोंदवले की, मराठीतील ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’, यांसारखे सामान्य उच्चार हे जोपर्यंत एखाद्याचा अपमान करण्यासाठी वापरले जात नाहीत, तोपर्यंत त्यांना अपमानास्पद किंवा घाणेरडे मानले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने सांगितले की, पक्षकार घरी मराठी बोलतात तेव्हा असे उच्चार सर्रास होतात. हे शब्द अपमान करण्याच्या हेतूने वोरले जात असल्याचे दाखवल्याशिवाय ते अपमानास्पद मानले जाऊ शकत नाही.
या प्रकरणी एका पत्नीने आपल्या पतीविरुद्ध शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला होता. पत्नीचा आरोप होता की, तिचा पती ‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’, असे शब्द वापरून आपला सतत अपमान करत असतो. यावर निर्णय देताना न्यायालयाने सांगितले, मराठी भाषेत असे शब्द सामान्य आहेत त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्याच्या हेतूने ते वापरले आहेत असे मानले जाऊ शकत नाही. (हेही वाचा: पत्नी दीर्घकाळ दूर असल्यास पतीने दुसऱ्या महिलेसोबत सहवास करणे क्रूरता नव्हे- हायकोर्ट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)