विधिमंडळ अधिवेशनाच्या आज सलग दुसर्‍या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येताच 'गद्दारी' वरून घोषणाबाजी झाली. दरम्यान नेमकं गद्दार कोण? असा सवाल विचारत शीतल म्हात्रेंचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये शिंदेगटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या म्हात्रे यांनी महाविकास आघाडी करून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटातील आमदारांनी  राजीनामे देऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावून निवडणूक जिंकून दाखवा असं प्रति आव्हान दिले आहे.

पहा शीतल म्हात्रे यांंचं आव्हान

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)