कोरोना व्हायरस लसीकरणासाठी 45 वर्षांची अट कमी करण्यात यावी. तसेच, राज्यातील नागरिकांना वयाची अट शिथील करुन कोरोना लस घेण्यास मान्यता देण्यात यावी अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, प्रत्यक्ष घटनास्थळावरुन वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही कोरोना लसीकरणाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. लवकरच या मागणीवर निर्णय घेतला जाईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)