Rahul Shewale Mother Passes Away: खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक; CM Eknath Shinde यांनी घेतलं अंत्यदर्शन

शिवसेना खासदार आणि पक्षाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

shewale| Twitter

 

खासदार राहुल शेवाळे यांना मातृशोक झाला आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या मातोश्री जयश्री रमेश शेवाळे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आज चेंबूर येथील साई रुग्णालयात जाऊन त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंत्यदर्शन घेतले आहे. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामधून राहुल शेवाळे हे खासदार आहेत. जयश्री शेवाळे 73 वर्षीय होत्या. त्या आजारी होत्या. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. काल रात्री त्यांना घरीच हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now