Pune Vande Bharat Train: पुण्याला मिळणार आणखी दोन वंदे भारत ट्रेन
आता देशात आणखी 10 वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून त्यापैकी दोन महाराष्ट्रातून चालवण्यात येणार आहेत.
पुण्यातून दोन नवीन वंदे भारत गाड्या (Vande Bharat trains) सुरू होणार असून नवीन गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. नव्या गाड्या पुण्याला वडोदरा आणि सिकंदराबादला (Pune with Vadodara and Secunderabad) जोडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) मंगळवारी 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, ज्या वेगवेगळ्या शहरांमधून चालवल्या जातील. पहिली वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते गांधीनगर दरम्यान सुरू झाली. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करण्यात आल्या. आता देशात आणखी 10 वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून त्यापैकी दोन महाराष्ट्रातून चालवण्यात येणार आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)