Nitin Desai Death Case: कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे पोस्ट मार्टम पूर्ण; JJ Hospital च्या शवागृहात मृतदेह
नितीन देसाई यांची लेक आणि जावई परदेशी स्थायिक असतात ते आल्यावर पुढील विधी केले जातील.
58 वर्षीय नितिन देसाई यांनी गळफास घेत 2 ऑगस्ट दिवशी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. आज त्यांच्या पार्थिवाचे पोस्ट मार्टम पूर्ण झाले आहे. दरम्यान प्राथमिक अहवालात त्यांचा मृत्यू फास लागल्याने झाल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. आता देसाई कुटुंबाने त्यांचा मृतदेह जे जे हॉस्पिटल मध्येच ठेवण्याचं आवाहन केले आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार 4 ऑगस्टच्या संध्याकाळी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओ मध्येच अंत्यसंस्कार होणार आहेत. नितीन देसाई यांची लेक आणि जावई परदेशी स्थायिक असतात ते आल्यावर पुढील विधी केले जातील.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)