राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजित पवार यांना बोलू दिले नसल्याची चर्चा प्रसारमाध्यमांतून कालपासून सुरु होती. या चर्चेवर स्वत: अजित पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. या वेळी त्यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले. तसेच, केवळ वॉशरुमला बाहेर गेलो तरीही प्रसारमाध्यमांनी बातम्या चालवल्याची खंतही व्यक्त केली.पुढे बोलताना ते म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन असल्याने मी बोललो नाही. मी नाराज नाही, मला बोलण्यासाठी कोणीही थांवले नाही. वॉशरुमला बाहेर गेलो होतो. तरीही बातम्या चालवल्या गेल्या. वस्तुस्थितीवर आधारीत बातम्या द्याव्यात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)