Dangerous Stunts on Roads Of Mumbai: मुंबई मध्ये बेशिस्तपणे स्टंट करत व्हिडिओ पोस्ट करणारा तरूण अटकेत (Watch Video)

मुंबई पोलिसांनी अशाप्रकारचे स्टंट्स न करण्याचे आवाहन केले आहे.

Stunt Video | Instaggram

मुंबई मध्ये बेशिस्तपणे स्टंट करणार्‍या एका व्यक्तीला आझाद मैदान पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. हा व्यक्ती चेंबूरचा आहे. मुंबई मध्ये तो अनेक ठिकाणी स्टंट करत असल्याचे व्हिडिओ वायरल झाले होते. मुंबई पोलिसांनी अशाप्रकारचे स्टंट्स न करण्याचे आवाहन केले आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणल्याचा आरोप आहे आणि अशाच घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)