Mumbai-Goa Highway: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणांना भेट दिली. यावेळी गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रामदास कदम यांनी भाजप नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना, महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल ‘निरुपयोगी मंत्री’ म्हटल्यानंतर आठवडाभराने मुख्यमंत्र्यांनी महामार्गावरील कामाचा आढावा घेतला. पत्रकारांशी बोलताना सीएम शिंदे म्हणाले, महामार्गावरील खड्डे आणि खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही चार प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची गैरसोय कमी होईल.
याआधी, मुंबई- गोवा महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून, नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. तसेच महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. (हेही वाचा: Mumbai-Pune Highway Accident: मुंबई-पुणे महामार्गावर एसटी आणि कारमध्ये भीषण अपघात; महिलेचा मृत्यू)
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा सरकारचा मानस-
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरु आहे. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस - मुख्यमंत्री pic.twitter.com/0lNZG82AUa
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 26, 2024
#WATCH | After inspecting the Mumbai-Goa Highway in Mumbai, Maharashtra CM Eknath Shinde says "The work for the Mumbai-Goa Konkan Highway is being done for a long time. Union Minister Nitin Gadkari also paid a lot of attention to it. He helped sanction loans for the contractor… pic.twitter.com/0fvDspPzAK
— ANI (@ANI) August 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)