लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मनसे महायुती मध्ये सहभागी होणार का? याची चर्चा सुरू झाली असताना आज राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यामध्ये मागील काही दिवसांंपासून सुरू असलेल्या चर्चांवर त्यांनी स्पष्टता  दिली आहे. यामध्ये आपण कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही असं म्हटलं आहे. तर तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे. त्याच चिन्हावर आमची वाटचाल सुरु राहणार असेही म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)