इमारतीतील पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण न झाल्याने मुंबईला लागून असलेल्या परिसरातील गृहनिर्माण संस्थेने सोसायटीमध्ये राजकारणी लोकांचा प्रवेश निषिद्ध केला आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथील इमारतीच्या समिती सदस्यांनी एक बॅनर इमारतीच्या बाहेर टांगला आहे, ज्यावर लिहिले आहे की- 'येथे राजकारण्यांचा प्रवेश निषिद्ध आहे'. शांतीनगर कॉम्प्लेक्स हा येथील सर्वात जुना व सर्वात मोठा परिसर आहे. शांतीनगर येथील सेक्टर 5 च्या 4 विंगच्या 80 फ्लॅट असलेल्या गोदावरी नावाच्या गृहनिर्माण संस्थेने एकत्रितपणे राजकारणी लोकांवर प्रवेश बंदी घातली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)