Khajuraho Express Fire Video: उदयपूर-खजुराहो एक्स्प्रेसच्या इंजिनला आग, प्रवाशांमध्ये खळबळ, Watch Video
माहिती मिळताच ग्वाल्हेरहून अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले.
Khajuraho Express Fire Video: उदयपूरहून खजुराहोला जाणाऱ्या उदयपूर-खजुराहो एक्स्प्रेसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ग्वाल्हेरमधील सिथोली स्टेशनजवळ ट्रेनच्या इंजिनला आग लागली, त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे लक्षात येताच लोको पायलटने सिथौलीजवळ ट्रेन थांबवून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच ग्वाल्हेरहून अग्निशमन दलाला तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले. वृत्त लिहीपर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होते. इंजिनला आग लागल्याने गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)