Jayant Patil Hospitalised: मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली, मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल
Jayant Patil | (Photo Credits: twitter)

Jayant Patil Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना मुंबईच्या (Mumbai) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जयंत पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पाहणी केली होती.

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना अचानक जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांनी बैठक अर्धवट सोडून मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, सतीष पाटील यांच्यासह अन्य काही मंत्री देखील असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज, अधिक लोकांना Immunize करून तिसर्‍या लाटेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करू : मंत्री राजेश टोपे

नुकतीच जयंत पाटील यांनी सांगली येथील पूरग्रस्त भागांची पाहणी केली होती. दरम्यान, अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, तर काही ठिकाणी ट्रॅक्टरने, पाण्यात बोटीचा वापर करत जयंत पाटलांनी सांगलीतील पूरस्थितीची दिवसभर पाहणी करत समस्या जाणून घेतल्या आहेत.