मान्सूनच्या आगमनादरम्यान मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. मान्सून सुरू झाल्यामुळे, भारताच्या आर्थिक राजधानीत पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी यासारख्या नागरी समस्या परत आल्या आहेत. सोमवारपासूनच शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मुंबईत अनेक भागात पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या पथकांनाही शहरात तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाची अनेक विहंगम दृश्ये सोशल मिडीयावर शेअर

मंत्रमुग्ध करणारे दृश्य!

मुंबईकरांची सध्याची स्थिती

#MumbaiRains mood 😎 pic.twitter.com/PGKfgJvv9u

— Swapnil Kulkarni (@swapcoolkarni) July 5, 2022

अलोभनीय दृश्य !

ढगांनी न्हाऊन निघालली सकाळ

मुंबईतील पावसाचे रात्रीचे दृश्य

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)