महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, केतन तिरोडकर याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये त्यांनी फडणवीस यांच्यावर ड्रग्ज माफियांविरुद्ध कडक कारवाई न केल्याचा आरोप केला होता. मुंबई गुन्हे शाखेने माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याआधी पोलिसांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केतन तिरोडकरला ताब्यात घेतले होते. (हेही वाचा: Ghatkopar Hoarding Collapse Incident: घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे फरार)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)