बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात कालपासून मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी आणखी पाऊस सुरू असून काही गावांचा संपर्क तुटल्याचेही वृत्त आहे. या दरम्यान जिल्हा प्रशासनाने 24 तास सतर्क व हाय अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. खरीप पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाने उघडीप घेताच विमा कंपनी,महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पंचनामे केले जातील.जीवित,वित्त किंवा पशु हानी होऊ नये याबाबत तातडीने उपाययोजना केल्या जातील.नागरिकांनी काळजी घ्यावी,जलाशय,नद्या व धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)