Coldplay Concert Passes Fraud: कोल्डप्ले कॉन्सर्ट पासचे आश्वासन देऊन 18 वर्षीय विद्यार्थ्याची 2.17 लाख रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल, तपास सुरु

चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा शोसाठी ऑनलाइन तिकीट शोधत असताना, 24 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

fraud | (File image)

Coldplay Concert Passes Fraud: सध्या भारतामध्ये जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या कोल्डप्ले शोची जोरदार चर्चा सुरु आहे. या कॉन्सर्टची तिकिटे लाखो रुपयांत विकली जात असल्याचे रिपोर्ट्स समोर आले आहेत. आता या कॉन्सर्टच्या तिकीट फसवणुकीचे आणखी ek उदाहरण समोर आले आहे. मुंबईच्या चुनाभट्टी येथील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याची सायबर फसवणूक करणाऱ्यांनी 2.17 लाखांची फसवणूक केली आहे. या विद्यार्थ्याला कोल्डप्ले कॉन्सर्टसाठी पास देण्याचे आश्वासन देऊन ही फसवणूक केली गेली. चुनाभट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा शोसाठी ऑनलाइन तिकीट शोधत असताना, 24 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या मुलाला इंटरनेटवर एक संपर्क क्रमांक मिळाला, जिथे त्या व्यक्तीने प्रत्येकी 7,500 आणि 10,000 च्या दरम्यान कॉन्सर्ट पास देऊ केला. या व्यक्तीवर विश्वास ठेवून, पिडीत मुलाने मित्र आणि कुटुंबासाठी 24 पासची विनंती केली आणि एकूण 2.17 लाख रुपये दिले. मात्र, त्याबदल्यात त्याला कोणतेही पास मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला. (हेही वाचा: Coldplay Mumbai Concert 2025: कोल्डप्ले कॉन्सर्टबाबत BookMyShow ने केली 500 कोटी रुपयांची फसवणूक; भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप, तक्रार दाखल)

कोल्डप्ले कॉन्सर्ट पासचे आश्वासन देऊन फसवणूक-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif