मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथली एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नूतन शासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.. व्यासपीठावरुन बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, व्यासपीठावरील आजी माजी एकत्र आले तर भावी सहकारी होतील. मुख्यमंत्री यांना नेमकं काय म्हणायचं होतं, अशी चर्चा आता या विधानंतर सुरु झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)