महाराष्ट्राला एक राजकीय परंपरा आहे. राजकीय नेता कितीही मोठा असला तरी तो शक्यतो ही परंपरा पाळतो. ही परंपरा म्हणजे कोणतेही काम असले तरी शासकीय काम अथवा पाहणी दौरा वगळता मुख्यमंत्री कोणाच्या भेटीला जात नाहीत. सर्व लोक मुख्यमंत्र्यांनाच भेटायला येतात. राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी वेळी मात्र ही परंपरा बदलताना दिसली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या आसनावरुन उठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांच्याकडे जाताना महाराष्ट्राने पाहिले. त्यांनी स्वत:चे आसून सोडून उपमुख्यमंत्र्यांच्या शेजारचे आसन घेतले आणि ते उपमुख्यमंत्र्यांच्या कानाशी लागून काही बोलू लागले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)