सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात, परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. मात्र, आमदारांसोबतच आता खासदारही एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ येताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. दरम्यान आता यावर प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)