नाशिक जिल्हयात नांदुर मधमेश्वर अभयारण्यात आयोजित पक्षी महोत्सवाला आजपासून सुरूवात झाली आहे. पर्यटन संचालनालय आणि राज्य वन विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायक्लोथॉन, अभयारण्याचा फेरफटका, पक्षी निरीक्षण, विविध विषयांवर चर्चासत्रे, वन्यजीव छायाचित्रण आदींसह विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती पर्यटन संचालनालय नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी पत्रकारांना दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)