Mumbai BEST Bus Revised Fare: मुंबई मध्ये बेस्ट बसची दरवाढ आजपासून लागू; पहा AC, Non AC बसच्या तिकीटांचे दर

मुंबई लोकल नंतर मुंबईकरांची अधिक पसंती बेस्ट बस सेवेला आहे. आजपासून मुंबई मध्ये तिकिटाचे दर दुप्पट झाले आहेत.

BEST Bus (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

मुंबई मध्ये बेस्ट बसची दरवाढ आजपासून लागू केली जाणार आहे. नव्या दरापत्रकानुसार, आजपासून मुंबईत एसी बसचं किमान तिकीट 6 रूपयांवरून 12 रूपये करण्यात आले आहे. नॉन एसी बस मध्ये किमान तिकीट 10 रूपये झाले आहे. तर 5-12 वयाच्या प्रवाशांना हाफ तिकीट विकत घ्यावं लागणार आहे. दिवसाचा ट्रॅव्हल पास आता 75 रूपये आणि महिन्याचा 1800 रूपये झाला आहे.  नवीन भाडे वाढ मध्ये 50  ​​किमी पर्यंतच्या 5 किमी स्लॅबमध्ये भाडे लागू केले जाईल आणि प्रत्येक स्लॅबमध्ये 5 रुपये वाढ होईल.

बेस्ट बसचे आजपासून लागू नवे तिकीट दर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement