शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे उद्यापासून औरंगाबादच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या ठिकाणी उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळाची पाहणी करतील. त्याआधी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव गावातील चव्हाण कुटुंबातील सदस्यांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर संवाद साधला आहे. परतीच्या पावसाने औरंगाबादसह आसपासच्या जिल्ह्यांना झोडपले आहे. ओल्या दुष्काळामुळे परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत पावसाने धुमाकूळ घातल्याने हा वर्षाचा मोठा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. चव्हाण कुटुंब हे त्यातीलच एक. आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. हा फोन कॉल सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)