एअर मार्शल विजय चौधरी यांच्या खांद्यावर वायुदलाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून ते 30 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत असून एअर मार्शल चौधरी त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारतील. चौधरी हे मुळचे #नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत.
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 23, 2021
‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी २००४ मध्ये वायुदल पदक,विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) September 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)