Pune Accident: ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या चालकाने पुण्यातील टिळक रोडवर भरधाव कार थेट दुकानात घुसवली, पहा व्हिडिओ

. काळे पडळ येथील शिवपुत्र कमलाकर बेल असे या चालकाचे नाव आहे. तो अलका सिनेमा हॉलपासून एस.पी. कॉलेजकडे वेगाने गाडी चालवत होता. साहित्य परिषद चौक ओलांडल्यानंतर, चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात बेलचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

Pune Accident (फोटो सौजन्य - X/@lokmat)

Pune Accident: पुण्यातील टिळक रोडवरील अपघाताचा (Accident) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका 19 वर्षीय चालकाने टिळक रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स दुकानात भरधाव कार घुसवली. रविवारी पहाटे ही घटना घडली. काळे पडळ येथील शिवपुत्र कमलाकर बेल असे या चालकाचे नाव आहे. तो अलका सिनेमा हॉलपासून एस.पी. कॉलेजकडे वेगाने गाडी चालवत होता. साहित्य परिषद चौक ओलांडल्यानंतर, चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात बेलचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने गाडी विरुद्ध फूटपाथवर वळली. त्यामुळे कार महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिकच्या शटरवर आदळली.

पुण्यातील टिळक रोडवर भरधाव कार थेट दुकानात घुसली, पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement