शिक्षण प्रसारक आणि समाजसेवक भाऊराव पाटील यांचा जन्मदिवस 22 सप्टेंबर. शिक्षणाची दारं समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीसाठी उघडणार्या भाऊरावांना त्यांच्या कार्यासाठी कर्मवीर म्हणून ओळखलं जातं. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केलेल्या 'कर्मवीरां'ना आज एनसीपी अध्यक्ष शरद पवार, वर्षा गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील जयंती
देवेंद्र फडणवीस
थोर शिक्षणतज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक वंचित, गरिबांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/XVoaBNkAvk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 22, 2022
वर्षा गायकवाड
बहुजन समाजाचा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट शिक्षणाच्या प्रसाराद्वारेच साध्य होऊ शकतो हे ओळखून पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबनाची मूल्ये शिकवली pic.twitter.com/qj04hbRFJM
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) September 22, 2022
शरद पवार
रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊराव पाटील यांनी ज्ञानाचा दिवा बहुजनांच्या घराघरात नेण्याचे बहुमोल कार्य केले. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जयंती दिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/34lDtEPRXm
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 22, 2022
धनंजय मुंडे
गोर-गरिबांच्या दारात शिक्षणाची गंगा पोचवणारे शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/MH2viTnzOo
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)