रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine Crisis) यांच्यातील युद्ध सुरू आहे. दरम्यान, भारत सरकारच्या पुढाकाराने युक्रेनमधून 219 प्रवाशांना घेऊन पहिले विमान महाराष्ट्रातील मुंबईत दाखल झाले आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून आज दुपारी विमानाने उड्डाण केले. युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केले की, "आमच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार मिशन मोडमध्ये काम करत आहे."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)