UttarPradesh Accident: मेरठ मध्ये भाविकांना घेवून जाणाऱ्या वाहनाचा तांत्रिक कारणांमुळे अपघात; अपघातात अनेक भाविकांचा मृत्यू

मेरठ येथे कंवार यात्रा सुरू असताना अपघात झाल्याचे समोर आले. तांत्रिक कारणांमुळे वाहनाचा अपघात झाला आहे.

Merath Yatra (Phoro credit - Twitter)

UttarPradesh Accident:  उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये (Merath) आज पहाटे कंवार यात्रेदरम्यान (Kanwar Yatra) भाविकांना  घेऊन जाणारे वाहनाचा अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली. वाहनांमध्ये असणारे अनेक भाविकांचा मृत्यू झाला.गाडी हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आल्यामुळे दुर्देैवी अपघात झाला. दरम्यान अनेक भाविकांचा मृत्यू झाला. भवनपूरच्या राली सुरू असताना चौहान गावात ही घटना घडली. सुमारे 16 भाविकांसह डीजे घेऊन जाणारे वाहन हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आल्याचे समजते. गावकऱ्यांनी आम्हाला सांगितले की 3-4 लोक मृत्यू मुखी पडले  आहेत. परंतु आम्ही अद्याप  मृतांची संख्या स्षट करू शकलो नाही.  असं एका पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांसमोर सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now