Monsoon Session:  कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी एकटेचं बसले आहे. भर पावसात त्यांनी एकटेच बसून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा... जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही. असं रोहित पवार भुमिका मांडत यांनी आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) बाहेरील  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे बसून आंदोलन करत आहे. सोशल मीडियावर त्यांनी आंदोलनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कर्जत येथील जामखेड परिसरातील एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाण्याच्या मुद्द्यांवरून रोहित पवार हे सरकारकडे विनंती करण्यासाठी  विधानभवनाजवळ आंदोलनाला बसले आहेत. हे आंदोलन एकट्यानेच सुरु केले आहे. शासन स्तरावर कारवाई होत नसल्याने रोहित पवार आंदोलन करण्यासाठी बसले आहे. रोहित पवारांच्या भेटीला मंत्र्यानी देखील हजेरी लावली आहे. आमदार शशिकांत शिंदे, शेकापचे जयंत पाटील आणि सरकारकडून गिरिश महाजन भेटीस आले होते. पावसाळी अधिवेशन चालू असताना रोहीत पवार यांनी भुमिका मांडली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)