Raj Thackeray Appeals For Karnataka Elections: 'एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा'; सीमाभागातील मराठी मतदारांना राज ठाकरे यांचं कळकळीचं आवाहन

आज कर्नाटकात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. तेव्हा राज ठाकरेंनी मराठी भाषिकांनी एकजुट दाखवण्याचं आवाहन केलं आहे.

Raj Thackeray | (Photo Credit : File Image)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा विषय जरी जुना असला तरीही तो आजही धगधगदा आहे. सीमाभागात मराठी भाषिकावर अन्याय होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असला तरीही कर्नाटकात 10 मे ला विधानसभेसाठी मतदान होत असताना मराठीची गळचेपी रोखण्यासाठी विधानसभेत मराठी आमदारांचा आवाज बुलंद असणं गरजेचे असल्याचं सांगत आता राज ठाकरे यांनीही सीमाभागातील मराठी मतदारांना एकजुट दाखवत मराठी उमेदवारालाच मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. एक ट्वीटर पोस्ट शेअर करत त्यांनी हे आवाहन केलं आहे. Karnataka Assembly Election 2023: ... तर मराठी भाषिकांनी ' जय भवानी जय शिवाजी' म्हणून मतदान करा; उद्धव ठाकरेंनी सुनावले (Watch Video) .

राज ठाकरे यांची पोस्ट