नॅशनल हेराल्ड (National) प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला आहे. या समन्समध्ये तारखांचा बदल करण्यात आला आहे. 25 जुलै ऐवजी 26 जुलै रोजीचा समन्स सोनिया गांधींना बजावण्यात आला आहे. यापूर्वी सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यावेळी सोनिया गांधींना कोरोना झाल्यामुळे त्या ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यांनी ईडीकडे पुढची तारीख मागितली होती. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) मात्र ईडी चौकशीसाठी उपस्थित राहिले होते.
Enforcement Directorate issued fresh summons to Congress interim President Sonia Gandhi to join probe in National Herald case on July 26 in place of July 25: Sources
(File pic) pic.twitter.com/1DQlAZTj7d
— ANI (@ANI) July 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)