PM Modi Wishes to Mallikarjun Kharge: आज काँग्रेसच्या अध्यक्ष निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शशी थरूर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. गेल्या 24 वर्षात पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता अध्यक्षपदावर पोहोचला आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केलं आहे. आपल्या सोशल मीडियावर ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, श्री मल्लिकार्जुन खर्गे जी यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी माझ्या शुभेच्छा. त्यांचा पुढील कार्यकाळ फलदायी जावो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)