Wives Misusing Section 498A: पतीच्या कुटुंबाला मुद्दाम अडकवण्यासाठी महिला करत आहेत कलम 498A चा दुरुपयोग; खोट्या खटल्यावर हायकोर्टाची टिप्पणी

विवाहित महिलेवर तिच्या सासरी अत्याचार केल्याप्रकरणी आयपीसीचे कलम 498A लागू करण्यात आले. हुंड्यासाठी छळ आणि हुंडाबळी हत्या या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 1983 मध्ये आयपीसीमध्ये कलम 498A समाविष्ट करण्यात आले होते.

Court (Image - Pixabay)

बुधवारी एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान, ओरिसा उच्च न्यायालयाने आयपीसी कलम 498-A च्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करत अतिशय कठोर टिप्पणी केली. पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी अशा कायद्याचा वापर केला जातो. मात्र पतीच्या कुटुंबाला मुद्दाम अडकवण्यासाठी महिला कलम 498A चा दुरुपयोग करत आहेत, असे न्यायालयाने म्हटले. ओरिसा उच्च न्यायालयाने एका महिलेवर तिच्या भावाच्या पत्नीने दाखल केलेला असा क्रूरतेचा खटला रद्द केला. हुंड्यासाठी आपली नणंद आपला छळ करत असल्याचे या महिलेचे म्हणणे होते. न्यायमूर्ती जी. सतपथी यांनी म्हटले की, कलम 498A अंतर्गत पत्नीवरील क्रूरतेच्या गुन्ह्याचा अनेकदा पतीच्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी गैरवापर केला जातो.

विवाहित महिलेवर तिच्या सासरी अत्याचार केल्याप्रकरणी आयपीसीचे कलम 498A लागू करण्यात आले. हुंड्यासाठी छळ आणि हुंडाबळी हत्या या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 1983 मध्ये आयपीसीमध्ये कलम 498A समाविष्ट करण्यात आले होते. हे अजामीनपात्र कलम आहे. स्त्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे किंवा तिचा जीव धोक्यात घालणे किंवा तिच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यास गंभीर दुखापत किंवा धोका याबाबत हे कलम आहे. (हेही वाचा: व्याभिचार आणि घटस्फोट प्रकरणात मुलांच्या DNA चाचणीस कोर्टाचा विरोध, हायकोर्टाने नोंदवले निरीक्षण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now