Paytm Shares Crash: आरबीआयच्या कारवाई नंतर पेटीएम च्या शेअर मध्ये मोठी घसरण
RBI ला पेटीएम पेमेंट्स बँकेच्या ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे कारवाई करत पेटीएम पेमेंट्स बँकेला 15 मार्चपर्यंत नोडल खाते सेटल करण्यास सांगितले आहे. नवीन ग्राहकांकडून ठेवी घेण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे.
आरबीआय ने पेटीएम च्या पेमेंट बॅंक वर निर्बंध घातल्यानंतर आज पेटीएम च्या शेअर मध्ये मोठी घसरण पहायला मिळाली आहे. पेटीएम चा शेअर 608.80 प्रति शेअर वर उघडला आहे. त्यानंतर काही मिनिटांतच 20% घसरण होत त्याला lower circuit लागले. त्यामुळे आरबीआय च्या कारवाईचे हे पडसाद असल्याचं पहायला मिळत आहे. आरबीआय च्या कारवाईचा ग्राहकांना मात्र अद्याप फटका बसलेला नाही. Paytm Layoffs: पेटीएममध्ये पुन्हा कर्मचारी कपात; 1 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)