Kerala Wayanad Landslide Death Toll: केरळच्या वायनाड भूस्खलन दुर्घटनेमधील मृतांची संख्या 84 वर, 116 जखमींची नोंद, राज्यात दोन दिवसांचा शोक जाहीर- Reports

या घटनेनंतर पिनाराई विजयन सरकारने आज आणि उद्या राज्यात अधिकृत शोक जाहीर केला आहे. वायनाडच्या चुरामाला येथील मशीद आणि मदरसा तात्पुरत्या रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहेत. हा भाग भूस्खलनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे.

Kerala Wayanad Landslide

Kerala Wayanad Landslide Death Toll: केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अहवालानुसार, यामध्ये आतापर्यंत 84 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 116 जखमींची नोंद झाली आहे. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. केरळ महसूल मंत्री कार्यायाने याबाबत माहिती दिली. भूस्खलनग्रस्त भागात लष्कर पोहोचले आहे. एनडीआरएफसह अनेक पथके बचाव कार्यात गुंतलेली आहेत. या घटनेनंतर पिनाराई विजयन सरकारने आज आणि उद्या राज्यात अधिकृत शोक जाहीर केला आहे. वायनाडच्या चुरामाला येथील मशीद आणि मदरसा तात्पुरत्या रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले आहेत. हा भाग भूस्खलनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने (PRD) वायनाड भूस्खलन मदत प्रयत्नांना मदत करण्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरीय माध्यम नियंत्रण कक्ष उघडले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शोध आणि बचाव कार्यासाठी पोलिस ड्रोन आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत. भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्य आणि संबंधित कार्यांसाठी वायनाडमध्ये लष्करी अभियांत्रिकी गट त्वरित तैनात केला जाईल. यासह केरळमधील कोझिकोडमध्येही मुसळधार पावसामुळे कालवे फुटले आहेत. रस्ते आणि अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. (हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; गुरुवारपासून कोकण, पुणे, कोल्हापूर परिसरात जोर वाढण्याची शक्यता)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now