Hyderabad Hit & Run: हैदराबादच्या वनस्थलीपुरममध्ये हिट अँड रनची घटना, अपघाताचा भीषण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
वनस्थलीपुरमचे पोलिस निरीक्षक अशोक रेड्डी यांनी सांगितले की, कारची ओळख पटली असून चालकाला पकडण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
हैदराबादच्या वनस्थलीपुरममधून हिट अँड रनची घटना समोर आली आहे, ज्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एनजीओ कॉलनीतील विवेकानंद पार्कसमोर भरधाव कारने महिला पादचाऱ्याला धडक दिल्याचे दिसून येते. या अपघातानंतर महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)