'Flower Bouquets Are New Soan Papdi': एनडीए नेत्यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा-पुन्हा भेट दिला एकच पुष्पगुच्छ, मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Watch)
यावेळी अनेक नेत्यांनी मोदींना पुष्पगुच्छ सादर केले. मात्र काही नेते असे होते ज्यांनी काहीच आणले नव्हते. अशावेळी या नेत्यांनी आधी देण्यात आलेले पुष्पगुच्छच पुन्हा-पुन्हा मोदींना दिले.
'Flower Bouquets Are New Soan Papdi': देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येत आहे. नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्याआधी आज दिल्लीमध्ये एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची मोठी बैठक पार पडली. यावेळी मोदींनी नव्या खासदारांना संबोधित केले. सध्या या बैठकीनंतरचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. बैठक संपल्यानंतर एनडीएचे सर्व नेते नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्याजवळ पोहोचले. यावेळी अनेक नेत्यांनी मोदींना पुष्पगुच्छ सादर केले. मात्र काही नेते असे होते ज्यांनी काहीच आणले नव्हते. अशावेळी या नेत्यांनी आधी देण्यात आलेले पुष्पगुच्छच पुन्हा-पुन्हा मोदींना दिले. म्हणजेच एकच पुष्पगुच्छ अनेक नेत्यांनी मोदींना दिला. हे हास्यास्पद दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर लोक याला, पुष्पगुच्छ हे नवीन सोनपापडी असल्याचे म्हणत आहेत. ज्याप्रमाणे सण-उत्सवात लोक स्वतःला मिळालेला सोन पापडीचा बॉक्स इतरांना देतात, तसेच इथे एकच पुष्पगुच्छ अनेक नेत्यांच्या हातून फिरत राहिला. (हेही वाचा: BJP Offering Free Recharge? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याच्या आनंदात भाजप 'फ्री रिचार्ज' देत असल्याचा दावा; जाणून घ्या काय आहे सत्य)
पहा व्हिडिओ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)