भारतात गेल्या 24 तासात 1,26,789 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली आहे. तर 59,258 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 685 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण संक्रमितांची संख्या 1,29,28,574 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1,18,51,393 कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशातील उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 9,10,319 इतकी आहे. तर आतापर्यंत तब्बल 16,68,62 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9,01,98,673 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)