उद्योगपती Gautam Adani यांनी घेतली इस्रायलचे पंतप्रधान Benjamin Netanyahu यांची भेट; म्हणाले- 'हैफा बंदर करार एक मैलाचा दगड'
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) आणि इस्रायलच्या गॅडोट ग्रुपने हैफा बंदराच्या खाजगीकरणासाठी USD 1.18 बिलियनची निविदा गेल्या वर्षी जुलैमध्ये जिंकली होती.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मंगळवारी अदानी समूहाचा इस्रायलमध्ये यशस्वी प्रवेश साजरा करण्यासाठी आयोजित समारंभाला उपस्थित राहिले. अडाणी समूहाने हैफा बंदर ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर आज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंगळवारी अदानी समुहासोबतचा हायफा बंदर करार हा एक ‘मोठा मैलाचा दगड’ असल्याचे म्हटले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संपर्क अनेक प्रकारे सुधारेल, असे नेतान्याहू म्हणाले. हैफा बंदर हे इस्रायलचे शिपिंग कंटेनर्सच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे बंदर आहे आणि पर्यटक क्रूझ जहाजांच्या शिपिंगमध्ये सर्वात मोठे आहे.
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) आणि इस्रायलच्या गॅडोट ग्रुपने हैफा बंदराच्या खाजगीकरणासाठी USD 1.18 बिलियनची निविदा गेल्या वर्षी जुलैमध्ये जिंकली होती. या वर्षी 11 जानेवारी रोजी खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली, त्यानंतर बंदरातील प्रगतीचे काम जोरात सुरू आहे. कन्सोर्टियममध्ये भारतीय भागीदाराची 70 टक्के भागीदारी आहे, तर इस्रायली भागीदार गॅडोटची 30 टक्के हिस्सेदारी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)