Nafe Singh Rathi Shot In Bahadurgarh: हरियाणातील बहादूरगडमध्ये आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार नफे सिंह राठी (Nafe Singh Rathi) यांच्यासह चार जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. त्यांच्या गाडीवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. सध्या ते शहरातील ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल आहेत. कारच्या खिडक्यांवरही गोळ्यांच्या अनेक खुणा आहेत. अंदाधुंद गोळीबारानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संपूर्ण नियोजन करून हा हल्ला करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांना गोळ्या लागल्या आहेत. हल्लेखोर आय-10 वाहनातून आले होते.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)